सातारा, फलटणमध्ये दारू बॉक्स जप्त

  |   Sataranews

सातारा : प्रतिनिधी

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (एलसीबी) सातारा शहरातील वाढे फाटा येथे व मलटण (ता. फलटण) येथे दोन ठिकाणी कारवाई करून दारू साठा जप्त केला. या कारवाईत कारसह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये फलटणमधील संजीव बार रेस्टॉरंटच्या मॅनेजरचा समावेश आहे. दरम्यान, एलसीबीच्या कारवाईचा गेल्या तीन दिवसांपासून धडाका सुरू आहे.

दि. 13 रोजी वाढे फाटा येथे दारू वाहतूक सुरू असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला असता एम एच 11 ए 7474 ही रिक्षा संशयास्पदरीत्या जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी रिक्षा थांबवून त्यामध्ये पाहणी केली असता देशी दारूचे बॉक्स आढळले. दारूची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याने ती ताब्यात घेण्यात आली. याप्रकरणी रवी अंकुश सकटे, आदील खलील शेख (दोघे रा. आकाशवाणी केंद्राजवळ) यांना ताब्यात घेण्यात आले....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/Alcohol-boxes-seized-in-Satara-Phaltan/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Satara/Alcohol-boxes-seized-in-Satara-Phaltan/

📲 Get Satara News on Whatsapp 💬