'साळगाव'चा विस्तार यंत्रसज्जतेद्वारे; भौगोलिक नव्हे

  |   Goanews

बार्देश : प्रतिनिधी

सांळगाव येथील कचरा प्रकल्पाचे विस्तारीकरण याचा अर्थ प्रकल्पाचा भौगोलिक विस्तार नसून येथील प्रकल्पात कार्यरत असलेल्या जुन्या यंत्रसामग्रीऐवजी नवी आधुनिक यंत्रणा बसवणे असा आहे. त्यामुळे प्रकल्पाशी संबंधित एकूण सत्तावीस पंचायत क्षेत्रातील जमा होणार्‍या कचर्‍यावर अधिक गतीने प्रक्रिया करणे सोपे होणार आहे. त्यांचप्रमाणे याजागी बसविण्यात येणार्‍या नव्या यंत्रसामग्रीमुळे प्रकल्पाची सध्याची क्षमता 130 टनांवरून 250टन इतकी होणार असल्याने कचरा प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे, असे कळंगुटचे आमदार तथा कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी सांगितले.

येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या सभागृहात कळंगुट व सांळगाव मतदारसंघातील पंचायतींच्या आमंत्रित सरपंचांना सदर प्रकल्पाच्या विस्तारीकरणासंबंधी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी दोन्हीं मतदार संघातील बहुतेक सरपंच तसेच सचिव पदावरील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. रविवारी सकाळी कचरा प्रकल्पाकडे जाणारे आच्छादन विरहित कचर्‍याचे ट्रक सांळगाव ग्रांमस्थांनी अडविल्याच्या कृतीचे लोबो यांनी समर्थन केले व आजपासून रस्त्यात घाण करीत येणार्‍या कचरा वाहनांना प्रकल्पात प्रवेश देण्यात येणार नाही, असे सांगून या संदर्भात प्रकल्पाशी संबंधित सर्व पंचायतींना सुचित केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. तथापि कचरा प्रश्नांवरून कुणीही राजकारण करू नये, असा सल्ला आमदार जयेश साळगावकर यांचे नांव न घेता उपस्थितांसमोर दिला....

फोटो - http://www.pudhari.news/news/Goa/salgaon-garbage-treatment-plant-expansion-issue-clarification-from-minister-lobo/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Goa/salgaon-garbage-treatment-plant-expansion-issue-clarification-from-minister-lobo/

📲 Get goanews on Whatsapp 💬