[ahmednagar] - महापालिकेची वसुली ठप्प

  |   Ahmednagarnews

कर्मचारी निवडणूक कामात व्यग्र; २९ कोटीच जमा

म. टा. प्रतिनिधी, नगर

'आधीच हौस...त्यात पडला पाऊस'...अशी अवस्था महापालिकेत्या वसुली विभागाची झाली आहे. यंदाचे आर्थिक वर्ष सुरू होऊन सात महिने झाले असताना महापालिकेच्या तिजोरीत अवघे २९ कोटी ३९ लाख रुपये आतापर्यंत जमा झाले आहेत. सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीतील कामासाठी वसुली विभागातील ८० टक्के कर्मचारी व्होटर स्लिपा घरोघरी पोहोचवण्याच्या कामात व्यग्र झाल्याने महापालिकेची वसुली ठप्प झाली आहे. शिवाय निवडणुकीनंतर या महिनाखेरीस दिवाळीही असल्याने महापालिकेची वसुली थेट नोव्हेंबरमध्येच पुन्हा जोमाने सुरू होण्याची चिन्हे आहेत.

एप्रिल २०१९मध्ये महापालिकेने यंदाचे घरपट्टी व संकलित कर वसुलीचे काम सुरू केले आहे. मागील वर्षी महापालिकेच्या इतिहासात विक्रमी अशी ६३ कोटींची वसुली झाल्यानंतर यंदाही सुरुवातीपासूनच वसुलीला जोर देऊन अधिकाधिक पैसे महापालिकेच्या तिजोरीत जमा करण्याचे काम अपेक्षित होते. सुरुवातीला तसे प्रयत्नही झाले. थकबाकीदारांना नोटिसा पाठवून त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाहीही केली गेली, पाणीपुरवठ्याचे नळ कनेक्शन्सही तोडले गेले. पण सात महिन्यात केवळ २९ कोटी ३९ लाखांची रक्कम महापालिकेकडे जमा झाली आहे. यंदाचे आर्थिक वर्ष सुरू होताना महापालिकेला वर्षभरात २२७ कोटी २० लाखांच्या वसुलीचे टार्गेट होते. पण त्यापैकी केवळ २९ कोटी ३९ लाख वसूल झाल्याने अजूनही १९७ कोटी ८१ लाखांची थकबाकी वसुलीचे आव्हान महापालिकेसमोर आहे....

फोटो - http://v.duta.us/C7ktmwAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/WpKYHwAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬