[kolhapur] - कार्यकर्ते जाजम टाकण्यासाठीच

  |   Kolhapurnews

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर

निवडणूक कोणतीही असो, प्रत्येक ठिकाणी उमेदवारी देताना नेहमीच घराणेशाही जपली जाते. सर्वसामान्य कार्यकर्त्याला डावलले जाते आणि दादा, भैय्या, आण्णा, भाऊ, ताई, वहिनी या नेत्यांच्या मुला-मुलींना अथवा सूनबाईंच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली जाते. मात्र, वर्षांनुवर्षे पक्षासाठी धडपडणाऱ्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडले जाते. त्यातून कार्यकर्त्यांच्या मनात, आम्ही फक्त जाजम टाकण्यासाठी असल्याची भावना उफाळते आणि अनेक ठिकाणी बंडखोरी होते. विधानसभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा जिल्ह्यात घराणेशाहीची परंपरा जोपासली गेल्याचे दिसून येत आहे.

आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यातील राजकीय इर्षा जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकीच्या माध्यमातून दिसून येते. दक्षिण विधानसभा मतदारसंघात हे दोन्ही नेते २००९ पासून आमने-सामने येत आहेत. सतेज पाटील यांनी 'दक्षिण' चे प्रतिनिधित्व करताना धनंजय महाडिक यांचा पराभव केला. त्याचा वचपा महाडिकांनी अमल महाडिक यांच्या रूपाने २०१४ मध्ये काढला. यावेळी पाटील यांनी पुतणे ऋतुराज यांच्या रुपाने महाडिक यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे. पण प्रत्येक निवडणुकीत एकमेकांसमोर आव्हान निर्माण करताना दोन्ही नेत्यांनी आपल्याच कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली. त्यामुळे या मतदारसंघात पक्षापेक्षा दोन्ही गटांचेच वर्चस्व पाहायला मिळत आहे. परिणामी सामान्य कार्यकर्त्यांची मात्र फरफट होत आहे. डॉ. डी. वाय. पाटील यांच्यापासून सुरू झालेली परंपरा त्यांचे नातू ऋतुराजपर्यंत आली आहे. तर महादेवराव महाडिक यांच्या कुटुंबीयांनीही घराणेशाही कायम ठेवली आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/isg7SAAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬