[mumbai] - आरोग्यचाचण्याचे प्रलोभन

  |   Mumbainews

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

सर्वसामान्यांना अवाक्याबाहेर असलेल्या दोनशे आरोग्यचाचण्या एक रुपयामध्ये करण्याचे आश्वासन शिवसनेने वचननाम्यामध्ये दिले असताना मोफत आरोग्यचाचण्यांचे प्रलोभन मुंबईतल्या अनेक मतदारसंघामध्ये राजकीय पक्षांनी दाखवायला सुरुवात केली आहे. विविध आजारांसाठी लसीकरण आणि निःशुल्क आरोग्यचाचण्या करून घेण्यासाठी मुंबईच्या विविध मतदारसंघामध्ये आरोग्यशिबिरांचे आय़ोजन केले जात आहे. त्यात थेट राजकीय पक्षाचा 'झेंडा' दिसत नसला तरीही या शिबिरांचे आय़ोजन ज्या पक्षाने केले त्याची मतदानाच्या दिवशी आठवण असू द्या, असे अप्रत्यक्षरित्या मुंबईकरांना सुचवले जाते. मात्र, या चाचण्यांचा तसेच लसीकरणाचा लाभ घेण्यापूर्वी योग्य खातरजमा करून घ्या, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

धारावी, मालवणी, मानखुर्द शिवाजीनगर, कुर्ला या ठिकाणी आरोग्याच्या प्रश्नांवर उमेदवारांनी भर दिलेला दिसतो. मानखुर्द मधील समपर्ण सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते राहुल पवार यांनी सांगितले की या मतदारसंघामध्ये हातावर पोट असलेल्या गरीब मतदारांचे प्रमाण मोठे आहे. आरोग्याचा प्रश्न हा सर्वसामान्यांसाठी कळीचा मुद्दा असतो. पश्चिम उपनगरातील काही उपनगरीय रुग्णालये दुरुस्तीसाठी बंद करण्यात आली आहेत. याठिकाणी मिळणारी आरोग्यसुविधाही मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे मिळेल तिथे आरोग्यसुविधा घेण्यासाठी हे गोरगरीब मतदार धाव घेतात. मात्र, या आरोग्यनिदान चाचण्या योग्य पद्धतीने केल्या जातात का, हे पाहण्याची तसदी घेतली जात नाही. कुर्ला येथील फिजिशिअन डॉ. प्रसाद पाटील यांनी 'लसीकरण करण्याची पद्धत योग्य आहे का, याची तपासणी केली जात नाही. लस देण्यापूर्वी ती एका विशिष्ट तापमानाला ठेवावी लागते, अन्यथा त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात, हेही लक्षात ठेवायला हवे,' असा इशारा दिला....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/h0TEmwAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬