[mumbai] - राणेंच्या भाजप प्रवेशावर उद्धव उद्या बोलणार?

  |   Mumbainews

मुंबई : कणकवलीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा भाजप प्रवेश आणि त्यांचे पुत्र व भाजप उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडल्यानंतर लगेचच शिवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली आणि सावंतवाडी अशा दोन ठिकाणी सभा घेणार असून या सभांमध्ये राणे यांच्या भाजप प्रवेशावर ते कोणती भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यपातळीवर शिवसेना आणि भाजपची युती झाली असली तरी किमान ५० मतदारसंघांत दोन्ही पक्षातील इच्छूकांनी बंडाचे निशाण फडकावत युतीच्या अधिकृत उमेदवारांपुढे आव्हान उभे केले आहे. त्यात सिंधुदुर्गातील बंडखोरीला शिवसेना विरुद्ध नारायण राणे या जुन्या वादाची किनार आहे. त्यामुळेच या जिल्ह्याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत....

फोटो - http://v.duta.us/lpzxTwAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/Imk2MAAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬