[mumbai] - शंभर रुपयांवरून महिलेची हत्या

  |   Mumbainews

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : शंभर रुपयांवरून झालेल्या वादातून एका तरुणाने देहविक्रय करणाऱ्या महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपाडा येथील कामाठीपुरा परिसरात घडली. जितेंद्र सिंग असे हल्लेखोर तरुणाचे नाव असून पकडण्यासाठी आलेल्या तरुणावरही त्याने चाकूने वार केले. नागपाडा पोलिसांनी जितेंद्र सिंग याला अटक केली.

कॅटरिंगमध्ये भाज्या चिरण्याचे काम करणारा जितेंद्र सिंग हा रविवारी शिवडी येथून मित्रासोबत वसई येथे जाण्यासाठी निघाला. मित्रासोबत दारू पिऊन झाल्यानंतर तो एकटाच कामाठीपुरा येथे आला. येथील ओळखीच्या देहविक्रय करणाऱ्या महिलेकडे जितेंद्र गेला. काही वेळ या ठिकाणी काढून त्याने या महिलेला पाचशे रुपयांची नोट दिली. त्यातील शंभर रुपये त्याने परत मागितले. मात्र पैसे देण्यास या महिलेने नकार दिला. यामुळे संतापलेल्या जितेंद्र याने बॅगेतील भाजी कापण्याच्या चाकूने या महिलेवर वार केले. महिलेला ठार करून जितेंद्र मुंबई सेंट्रलच्या दिशेने पळू लागला. येथील नागरिकांबरोबरच पोलिसांनी देखील त्याचा पाठलाग सुरू केला. जितेंद्रला अडविण्यासाठी शहाबाज मर्चंट हा तरुण पुढे सरसावला असता हातातील चाकूने त्याने शहाबाज याच्यावरही वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शहाबाज याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नागपाडा पोलिसांनी दिली.

फोटो - http://v.duta.us/C4WB6wAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/JM-FTwAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬