[nagpur] - नरेंद्र मोदी जातात तिथे खोटे बोलतात: राहुल गांधी

  |   Nagpurnews

यवतमाळ: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यवतमाळ येथील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर तोफ डागली. सामान्यांच्या बँक खात्यात ना १५ लाख रुपये आले आणि ना सहा हजार रुपये जमा झाले. पण मोदी जातात तिथे खोटे बोलतात, असा घणाघात राहुल यांनी केला.

मागील निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपनं दिलेल्या आश्वासनांवरून राहुल गांधी यांनी लक्ष्य केलं. यावेळी त्यांनी शेतकरी आत्महत्या, वाढती बेरोजगारी आदी मुद्द्यांवर भर दिला. लोकसभा निवडणुकीत प्रत्येकाच्या खात्यात सहा हजार रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. त्याआधीच्या निवडणुकीत प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. तुमच्या बँक खात्यात पंधरा लाख रुपये किंवा सहा हजार रुपये जमा झाले का? असा सवाल राहुल गांधी यांनी केला. जेथे-जेथे मोदी जातात. तिथे ते खोटे बोलतात, असा आरोपही त्यांनी केला. मोदी कधी चंद्रावर बोलतात. कधी जम्मू-काश्मीर, तर कधी कलम ३७० वर बोलतात. कधी कार्बेट पार्कात जाऊन चित्रपट बनवण्याची भाषा करतात. पण तुमच्यासमोरील मुद्दे, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगार शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत चकार शब्दही काढत नाहीत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. पण ते मिळालं का, असा सवालही राहुल यांनी केला....

फोटो - http://v.duta.us/xa-8-QAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/vL9fuQAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬