[nashik] - अॅड. आंबेडकरांची आज होणार सभा

  |   Nashiknews

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना व डावी आघाडी पुरस्कृत माकपाचे उमेदवार डॉ. डी. एल. कराड यांच्या प्रचारात वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अॅड. प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा मंगळवारी (दि. १५) होणार आहे.

उंटवाडी, लवाटेनगरमधील सिटी सेंटर मॉल रोडवरील ठक्कर डोम येथे दुपारी तीन वाजता सभेला सुरुवात होईल, असे 'माकप'च्या वतीने सीताराम ठोंबरे यांनी कळविले आहे. नाशिकला पहिलीच सभा आंबेडकर यांची होत असल्याने ते काय भाषण करतात, याकडे इतर पक्षांचे लक्ष असणार आहे. सभेला डॉ. कराड यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वामनराव पवार, पवन पवार, नाशिक मध्यचे उमेदवार संजय साबळे यांसह कामगार उपस्थित राहणार आहेत.

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/yTYGUQAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬