[nashik] - शिवसेनेचा भाजपला दे धक्का?

  |   Nashiknews

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेवर सोमवारी बहिष्कार टाकून शिवसेनेने भाजपपुढे गुडघे न टेकण्याचे धोरण स्वीकारले आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून येत असलेल्या दबावापुढेही न झुकण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. त्याबाबत शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून भाजपला मंगळवारी मोठा धक्का दिला जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. दुसरीकडे, नाशिक पश्चिम मतदारसंघातील बंडखोरी रोखून शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये सोमवारी दाखल झाले. त्यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांशी संपर्क सुरू केला आहे.

नाशिक पश्चिम मतदारसंघातील दावेदारीवरून सध्या शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष रंगात आला आहे. शिवसेनेची ताकद असताना महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ विद्यमान आमदार सीमा हिरे या भाजपच्या असल्याने त्यांच्या पक्षाला सोडण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांसह महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी आता पक्षासह भाजपविरोधात बंड पुकारले आहे. शिवसेनेकडून भाजपच्या सीमा हिरेंविरोधात गटनेते विलास शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी केली आहे. शिंदे यांच्या समर्थनासाठी शिवसेनेचे या विभागातील २१ नगरसेवक मैदानात उतरले आहेत. शिवसेनेच्या या बंडखोरांनी खासदार संजय राऊत आणि संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांचे दबावतंत्रही झुगारले आहे. त्यामुळे आता भाजपची कोंडी झाली आहे. मात्र, भाजपकडून या बंडखोरीला फारसे महत्त्व देण्यात आले नव्हते. आता शिवसेनेच्या बंडखोरीने भाजपला घाम फोडला असून, शिवसेनेच्या नेत्यांची मनधरणी सुरू केली आहे. पालकमंत्री महाजन सोमवारी नाशिकमध्ये दाखल झाले असून, त्यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांशी संपर्क केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे शिवसेना मात्र आपल्या बंडावर कायम राहणार असल्याची चर्चा आहे....

फोटो - http://v.duta.us/8q0EHgAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/GjymQwAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬