[pune] - मोबाइल कंपनीला घडवली अद्दल

  |   Punenews

पुणे : किरकोळ रकमेचा प्रश्न आहे, म्हणून त्रास होत असला तरी अनेकदा ग्राहक वेळेचा अपव्यय नको म्हणून तक्रार करण्यास टाळाटाळ करतात. मात्र, त्यामुळे ग्राहकांना गृहित धरणाऱ्या कंपन्यांचे चांगलेच फावते. मात्र, एका तक्रारदाराने सलग तीन वर्षे पाठपुरावा करून स्वत:ची बाजू मांडून दावा जिंकला. ग्राहक मंचाने तक्रारदाराच्या बाजूने निकाल देऊन मोबाइल कंपनीला दणका दिला.

तक्रारदाराला मोबाइलच्या बिलापोटी आठ हजार ९९९ रुपये, त्यावर मे २०१६ पासून नऊ टक्के व्याज दराने रक्कम द्यावी. तसेच, तक्रारदाराला झालेल्या मानसिक, शारीरिक त्रासापोटी सहा हजार रुपये, तक्रारीचा खर्च म्हणून एक हजार रुपये देण्यात यावेत, असा आदेश ग्राहक मंचाने दिला. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष अनिल खडसे, सदस्या क्षितिजा कुलकर्णी, संगीता देशमुख यांनी हा निकाल दिला. या प्रकरणी तक्रारदाराने 'इंटेक्स टेक्नॉलॉजीज (इंडिया) लिमिटेड', ओखला इंडस्ट्रियल इस्टेट फेज २, नवी दिल्ली, इंटेक्स टेक्नॉलॉजीजचे व्यवस्थापक, युनिव्हर्सल एंटरप्रायझेसचे मालक, ए विंग, शॉप नं. ४९, पाटील प्लाझा यांच्याविरुद्ध दावा दाखल केला होता. तक्रारदार सरकारी कर्मचारी असून, त्यांनी स्वत: मंचापुढे आपली बाजू मांडली....

फोटो - http://v.duta.us/MHkGPgAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/OVGJHAAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬