[thane] - नालासोपाऱ्यात १९ हजार बोगस मतदार?

  |   Thanenews

'बविआ'कडून जिल्हाधिकाऱ्यांना यादी सादर

म. टा. वृत्तसेवा, वसई

इतर मतदारसंघांतील मतदारांची नावे नालासोपारा मतदारसंघात असल्याची तक्रार बहुजन विकास आघाडीने केली होती. मात्र तपासात बोगस मतदार नसल्याचे पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. तसेच, बोगस मतदारांची यादी असल्यास ती सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार बविआने शोध घेऊन इतर मतदारसंघांत नावे असलेल्या १९ हजारांहून अधिक मतदारांची नावे नालासोपाऱ्यातही असल्याचे पुरावे सोमवारी पत्रकार परिषदेत सादर केले.

पालघर जिल्ह्यातील सर्वात जास्त मतदार नालासोपारा मतदारसंघात आहेत. पाच लाखांहून अधिक मतदार येथे असून त्यातील एक लाखाच्या आसपास मतदारांची नावे बोगस असल्याचा आरोप करत 'बविआ'ने याबाबत पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली होती. याबाबतच्या चौकशीत बोगस मतदार आढळून आले नाहीत, मात्र नोंदणी करताना सारखी असणारी काही नावे आढळून आली असून ती सहा हजारांच्या आसपास असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. बोगस मतदार आढळल्यास ती यादी सादर करण्याचे आवाहन 'बविआ'ला केले असल्याचे पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना सांगितले होते....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/7auJRwAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬