[thane] - पोलिस ठाण्यात जीवघेणा हल्ला

  |   Thanenews

जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

म. टा. वृत्तसेवा, वसई

मेहुण्याने बहिणीच्या पतीवर भरदिवसा पोलिस ठाण्यातच जीवघेणा हल्ला केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी साडेचार वाजता नालासोपारा पोलिस ठाण्यात घडली आहे. या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बहिणीने आत्महत्या केली म्हणून तिच्या पतीची चाकूने हत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

नालासोपारा पश्चिम येथे राहणाऱ्या कोमल कोळेकर (२०) हिने रविवारी सकाळी राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली होती. कोमलचे नातेवाईक साताऱ्याला राहत असून तिच्या अंत्यसंस्कारासाठी ते नालासोपारा येथे आले होते. आत्महत्येप्रकरणी तिच्या नातेवाईकांना आणि पती आकाश कोळेकर (२५) याला नालासोपारा पोलिस ठाण्यात बोलाविण्यात आले. नालासोपारा पोलिस ठाण्यात चौकशी सुरू असताना कोमलचा भाऊ रवींद्र काळे याने स्वत:कडील चाकू काढून आकाशवर हल्ला केला. यामध्ये आकाश जबर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी रवींद्र यावर गुन्हा नोंदविला असून अधिक तपास करीत असल्याचे वसई अपर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर यांनी सांगितले.

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/ZixVIAAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬