'अमित शहाला गेल्या पाच वर्षांपूर्वी कोण ओळखत होतं का ?'

  |   Maharashtranews

रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : मी काय केलं असं म्हणणाऱ्या या अमित शहाला गेल्या पाच वर्षांपूर्वी कोण ओळखत तरी होत का ? तुम्ही इतक्या वर्ष कोठे होते. मी काय केलं म्हणणाऱ्या अमित शहा लेका, तुम्ही महाराष्ट्रात काय काम केलं ? इथे काय दिवे लावले ते सांगा, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. सांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठेमहंकाळ मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुमनताई आर.आर.पाटील यांच्या प्रचारसभे दरम्यान बोलत होते. तासगाव मधील चिंचणी गावात ही सभा झाली.

कुस्तीची भाषा मुख्यमंत्री बोलत आहेत. तुम्ही अशी भाषा करू नका. कुस्ती करणं हे तुमचं काम नाही. मी कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे. पैलवान तयार करण्याचे काम मी करत असतो. आणि त्यामुळे कुस्ती करणं हे तुमचं काम नाही अशी टीका शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे....

फोटो - http://v.duta.us/9Kj8bAAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/9Gp1lQAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬