कणकवलीत उद्धव ठाकरेंचा राणेंवर हल्लाबोल, भाजपाला सावधानतेचा इशारा

  |   Maharashtranews

कणकवली : विधानसभा निवडणूक २०१९ च्या रणधुमाळीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज कणकवलीच्या रणांगणात दाखल झाले. इथं त्यांनी जाहीर सभेतील आपल्या भाषणात भाजपात 'स्वाभिमान' विलीन करणाऱ्या नारायण राणेंचा चांगलाच समाचार घेतला. कणकवली विधानसभा मतदारसंघातून नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सतीश सामंत यांनी दंड थोपटलेत. 'राणे गेले तिथं वाट लावली' अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी या सभेत केली. यावेळीच, भाजपाशी किंवा कुणाशीच आपली 'दुष्मनी' नाही, हे उद्धव ठाकरेंना आवर्जुन आपल्या भाषणात सांगावं लागलं. पण, त्याचवेळी 'दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर मोडून-तोडून काढू' असा इशाराही त्यांनी आपल्या विरोधकांना दिला. 'नाणार'सारखा प्रकल्प आपल्याला नकोय, असंदेखील त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं....

फोटो - http://v.duta.us/xTlnEwAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/9xT1tQAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬