कणकवलीत उद्धव ठाकरेंचा राणेंवर हल्लाबोल, भाजपाला सावधानतेचा इशारा

  |   Maharashtranews

कणकवली : विधानसभा निवडणूक २०१९ च्या रणधुमाळीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज कणकवलीच्या रणांगणात दाखल झाले. इथं त्यांनी जाहीर सभेतील आपल्या भाषणात भाजपात 'स्वाभिमान' विलीन करणाऱ्या नारायण राणेंचा चांगलाच समाचार घेतला. कणकवली विधानसभा मतदारसंघातून नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सतीश सामंत यांनी दंड थोपटलेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज कणकवलीत जाऊन नारायण राणेंवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. 'नारायण राणे ही पाठित वार करणाऱ्याची औलाद आहे' असं सांगत भाजपानं त्यांच्यापासून सावध राहावं असा सल्ला उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिला. राणेंची गुंडगिरी संपवून सिंधुदुर्गात भगवा फडकवा असं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं. जे मातोश्रीच्य़ा मिठाला जागले नाहीत अशा खुनशी प्रवृत्तीची माणसं भाजपात नकोत असा सावधगिरीचा इशाराही त्यांनी भाजपाला दिला. राणेंच्या भाजपा प्रवेशानं 'स्वाभिमान' हा शब्द आज मुक्त झाला असेल, असा टोलाही त्यांनी लगावला....

फोटो - http://v.duta.us/xTlnEwAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/-yBALgAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬