डिजिटल मीटरप्रश्नी सरकारला न्यायालयाची अवमान नोटीस

  |   Goanews

पणजी : प्रतिनिधी

टुरीस्ट टॅक्सींना ऑगस्टपासून डिजिटल मीटर बसवण्याचे न्यायालयास दिलेले आश्वासन पाळण्यात सरकारला अपयश आल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मंगळवारी (दि.15) अवमान नोटीस जारी केली. उच्च न्यायालयाने या नोटीसीला 22 ऑक्टोबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले आहेत. पुढील सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.

गोवा सरकारने राज्यातील टुरीस्ट टॅक्सींना डिजिटल मीटर बसवण्यात येतील, असे जुलै महिन्यात न्यायालयाला सांगितले होते. 1 ऑगस्टपासून हे डिजिटल मीटर बसवण्यास सुरुवात केली जाईल व काम सहा महिन्यांत पूर्ण केले जाईल, असे यावेळी न्यायालयात सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात सरकारकडून न्यायालयाला देण्यात आलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यास सरकारला अपयश आले आहे. त्याची गंभीर दखल घेऊन न्यायालयाने अवमान नोटीस जारी केली आहे. वाहतूक खात्याकडून 1 ऑगस्टपासून डिजिटल मीटर बसवण्याचे काम हाती घेतले जाणार होते. तत्पूर्वी खात्याने वर 16 जुलैपासून हे मीटर प्रायोगिक तत्वावर बसवले जाईल, असेही न्यायालयास कळवले होते. मात्र, प्रत्यक्षात त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही....

फोटो - http://www.pudhari.news/news/Goa/Court-issues-contempt-notice-to-government-on-digital-meter-in-goa/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Goa/Court-issues-contempt-notice-to-government-on-digital-meter-in-goa/

📲 Get goanews on Whatsapp 💬