'त्या' दहा काँग्रेस आमदारांविरोधी अपात्रता याचिकेवर सुनावणी

  |   Goanews

पणजी : प्रतिनिधी

काँग्रेस पक्षातील 10 आमदारांनी भाजपमध्ये केलेल्या पक्षांतराविरूद्ध काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवर मंगळवारी (दि.15) सभापती राजेश पाटणेकर यांनी सुनावणी घेतली. याचिकादाराच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या जबानीची नोंद करून घेतली असून 10 आमदारांना नोटीस पाठवायची की नाही यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे, असे सभापती राजेश पाटणेकर यांनी सांगितले.

यंदाच्या जून महिन्यात काँगेे्रसच्या पंधरा आमदारांपैकी दोन-तृतीयांश, म्हणजे दहा आमदारांना एकाचवेळी भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता. यात विद्यमान उपसभापती तथा काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस, उपमुख्यमंत्री तथा केपेचे आमदार चंद्रकांत कवळेकर, जलस्रोत मंत्री तथा वेळ्ळीचे आमदार फिलीप नेरी रॉड्रिग्स, महसूलमंत्री तथा ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात, पणजीचे बाबूश मोन्सेरात, कुंकळ्ळीचे क्लाफासिओ डायस, नुवेचे विल्फे्रड डिसा, थिवीचे निळकंठ हळर्णकर, सांत आंद्रेचे फ्रान्सिस सिल्वेरा आणि सांताक्रुजचे टोनी फर्नांडिस या आमदारांचा समावेश होता. या दहा आमदारांना अपात्र ठरवावे, अशी मागणी करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी अपात्रता याचिका दाखल केली होती....

फोटो - http://www.pudhari.news/news/Goa/Hearing-on-disqualification-petition-against-ten-Congress-MLAs/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Goa/Hearing-on-disqualification-petition-against-ten-Congress-MLAs/

📲 Get goanews on Whatsapp 💬