दिशाहीन काँग्रेस महाराष्ट्राला दिशा देऊ शकत नाही - स्मृती ईराणी

  |   Maharashtranews

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूर शहर मतदारसंघातील भाजप उमेदवार शैलेश लाहोटी यांच्या प्रचारासाठी आज लातूरमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांची सभा झाली. लातूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवरील टाऊन हॉल येथे झालेल्या सभेत स्मृती ईराणी यांनी काँग्रेसवर आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.

काही दिवसांपूर्वीच औसा येथील सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्जमाफीवरुन भाजप सरकार टीका केली होती. यावरुन ईराणी यांनी राज्यात फडणवीस सरकारने ५० लाख शेतकऱ्यांचे २४ करोड रुपये माफ केल्याचा दावा केला आहे. तसेच राहुल गांधी यांनी पुढे येऊन कर्जमाफीच्या मुद्दावर चर्चा करण्याचे आवाहन केले आहे.

काँग्रेस पार्टी ही स्वतःच दिशाहीन असल्यामुळे महाराष्ट्राला काँग्रेस काय दिशा देऊ शकेल? असा सवाल यावेळी ईराणी यांनी उपस्थित केला. त्यामुळे दिवाळीत ज्या प्रमाणे महिला घरातील कचरा साफ करतात त्याप्रमाणे काँग्रेसला साफ करण्याचे आवाहन ही यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी यावेळी केले.

फोटो - http://v.duta.us/maVyUQAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/qzcvkAAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬