प्रशासन कधी जागणार! पाण्यासाठीही शेतकऱ्यांना करावे लागते आंदोलन

  |   Gadchirolinews

चामोर्शी,

दीना धरणातील पाण्याचे नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्याची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आल्यामुळे गावात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे त्यामुळे गावकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ आली आहे. चामोर्शीत पाण्याचे नियोजन करणारे अधिकारी डी.वि. लांडगे यांची निवडुकीसाठी नियुक्ती केल्यामुळे पाण्याची कमतरता भासत आहे. त्यामुळे त्यांना निवडणूक अधिकाऱ्याच्या जबाबदारीतून मुक्त करून पूर्णवेळ पाणी वाटपासाठी कार्यरत करण्यात यावे अशी मागणी करत परिसरातील नागरिकांनी माजी पंचायत समिति सदस्य प्रमोद भगत यांच्या नेतृवात उपविभागीय अधिकारी सिंचाई शाखा चामोर्शी येथे शेकडो शेतकऱ्यांसह धड़क दिली.

यावर्षी भरपूर पाऊस होऊन सुद्धा शेतकरी शेवटच्या पाण्याच्या गरजेखातर धानपिक वाचविण्यासाठी धडपड करित आहे. भेंडाला परिसरातील मार्कंडा, फराडा, रामाडा, मोहोर्ली, फोकोर्डी, खंडाला, नवेगांव, कानहोली, वेलतुर तुकुम, सगनापुर, वाघोली, रामसागर कळमगावातील धान पिक पोटरीवर आले असून एका पाण्याची आवश्यकता आहे. परंतु दीना धरणाचे पाणी शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहचत नसल्याने धानाचे पिक हातचे जाण्याची वेळ आली आहे. तसेच जोपर्यंत पाणी वाढणार नाही तो पर्यन्त येथून हटनार नाही अशी भूमिका घेतली. पण अजूनपर्यंत कोणीही अधिकारी शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास आले नसल्यामुळे शेतकरीवर्ग कार्यालय परिसरात बसून आहेत तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन धानाचे पिक वाचवण्यासाठी पाण्याची सोय करावी अशी मागणी केली आहे.

फोटो - http://v.duta.us/7Gl-7QAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/0xTPLgAA

📲 Get Gadchirolinews on Whatsapp 💬