प्रशासन गुंतले निवडणुकीच्या कामात; वाळूची अवैध वाहतूक जोरात!

  |   Akolanews

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत महसूल प्रशासन निवडणुकीच्या कामात गुंतल्याची संधी साधून जिल्ह्यात वाळूची अवैध वाहतूक जोरात सुरू आहे. त्यामुळे वाळूच्या स्वामीत्वधन शुल्कापोटी (रॉयल्टी) शासनाच्या खात्यात जमा होणाऱ्या महसुलास चुना लागत असून, वाळूची अवैध वाहतूक आणि विक्रीच्या गोरखधंद्यातून वाळू माफियांची चांगलीच चांदी होत आहे.

जिल्ह्यात गतवर्षी ११ वाळू घाटांचा लिलाव करण्यात आला होता. या लिलावाची मुदत गत ३० सप्टेंबरला संपली असून, यावर्षी जिल्ह्यात ६० वाळू घाटांचा लिलाव प्रस्तावित असून, लिलाव प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून, महसूल प्रशासन निवडणुकीच्या कामात गुंतले आहे. महसूल विभागाचे अधिकारी -कर्मचारी आणि तालुकास्तरावरील भरारी पथके निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याची संधी साधून, जिल्ह्यातील वाळू घाटांमधून वाळूची अवैध वाहतूक जोरात सुरू आहे. वाळू घाटांचा लिलाव झालेला नसताना वाळूचे अवैध उत्खनन आणि अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने, वाळूच्या स्वामीत्वधन शुल्कापोटी शासनाच्या खात्यात जमा होणाºया महसुलास चुना लागत आहे, तर दुसरीकडे वाळूची अवैध वाहतूक आणि विक्रीच्या गोरखधंद्यातून वाळू माफियांची मात्र चांगलीच चांदी होत आहे....

फोटो - http://v.duta.us/XzkTDQAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/ol87MwAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬