फडणवीसच मुख्यमंत्री होणार, शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय निकालानंतर - अमित शहा

  |   Maharashtranews

नवी दिल्ली : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद द्यायचं का, याचा विचार निवडणुकीच्या निकालानंतर करु, असं केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीनं इक्बाल मिरचीशी असलेल्या संबंधांच्या आरोपांचा खुलासा करावा, असं आव्हानही अमित शाह यांनी शरद पवारांना दिलं आहे. झी मीडियाचे समूह संपादक सुधीर चौधरी यांनी घेतलेल्या EXCLUSIVE मुलाखतीत अमित शाह यांनी विविध विषयांवर रोखठोक उत्तरं दिली.

महाराष्ट्रात एनडीएचं सरकार आलं तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असणार आहेत. महाराष्ट्रात एनडीएला बहुमत मिळेल असा त्यांना पूर्ण विश्वास आहे. शिवसेना महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाचा दावा करत आहे यावर उत्तर देताना अमित शहा यांनी म्हटलं की, महाराष्ट्रात एनडीएचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली जात आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील....

फोटो - http://v.duta.us/Zpi0egAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/pIMnOQAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬