भाजपचा संकल्प पत्र चुनावी जुमला, राष्ट्रवादीची जोरदार टीका

  |   Maharashtranews

अहमदनगर : भाजपचे संकल्प पत्र हे चुनावी जुमला आहे, अशा शब्दांत, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका केली. त्याचवेळी विजय शिवतारेंना कॅबिनेट मंत्रिपद देणार या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचा समाचार घेताना, शिवतारेंची सीट धोक्यात असल्याचे अजित पवार म्हणाले. अहमदनगरमधल्या कर्जत तालुक्यातल्या प्रचारसभेत ते बोलत होते.

दरम्यान, भारतरत्न हे सरकारचे इलेक्शन गिमिक असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे. काल कल्याणमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या सभेनंतर त्यांनी ही टीका केली. भाजपने आपले संकल्प पत्र जाहीर केले असून यात स्वातंत्रवीर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस करणार असल्याचे म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षात आपण ही मागणी मागील २ ते ३ वर्षांपासून लोकसभेत करत होतो. त्यावेळीही यांचेच सरकार होते, मग निवडणुका आल्यावरच यांना भारतरत्न का आठवला? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला....

फोटो - http://v.duta.us/Efwg7QAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/ZDzOtAAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬