भिलवडीत पत्नीचा गळा चिरून खून

  |   Sanglinews

भिलवडी : प्रतिनिधी

भिलवडी (ता. पलूस) येथे सौ. सुमन ज्ञानदेव पाटील (वय 55) हिचा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली. या घटनेनंतर संशयित पती ज्ञानदेव बाबुराव पाटील (वय 64) याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, दोर तुटल्याने तो थेट भिलवडी पोलिस ठाण्यात हजर झाला.

भिलवडी पोलिस ठाण्यातून देण्यात आलेली माहिती अशी ः संशयित ज्ञानदेव पाटील याला दोन मुले आहेत. एक मुलगा चिपळूण येथे नोकरी करतो. दुसरा मुलगा शेती करतो. काही महिन्यांपूर्वी या कुटुंबाने घराचे बांधकाम सुरू केले आहे. त्यामुळे हे कुटुंब भाड्याच्या घरात राहते. गेल्या अनेक वर्षांपासून ज्ञानदेव हा पत्नी सुमन पाटील यांच्या चारित्र्यावर संशय घेत असे. यातून त्यांच्यात अनेकदा कडाक्याचे भांडण झाले होते. हे भांडण त्यांच्या दोन मुलांनी कित्येकदा मध्यस्थी करून मिटवले होते....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/wife-murdered-by-husband-in-bhilawadi-sangli/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Sangli/wife-murdered-by-husband-in-bhilawadi-sangli/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬