मोटर वाहन विभागात घंटागाड्यांची नोंदच नाही!

  |   Akolanews

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला: महापालिकेच्या मोटर वाहन विभागाचा कारभार रसातळाला गेला असून, त्याचे परिणाम समोर येऊ लागले आहेत. या विभागाच्या अखत्यारीत असलेल्या घंटागाड्या बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही घंटागाड्या बेवारस स्थितीत असताना संबंधित जबाबदार वाहन चालकाला जाब विचारण्याची हिंमत विभाग प्रमुख श्याम बगेरे यांना नसल्यामुळे की काय, या विभागाचे 'तीन-तेरा' वाजल्याचे केविलवाणे चित्र आहे. या गंभीर प्रकरणाची महापालिका आयुक्त संजय कापडणीस दखल घेतील का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

शहरात दररोज २२० टनपेक्षा अधिक कचरा निर्माण होतो. २०१५ पूर्वी घरातून निघणारा कचरा सर्व्हिस लाइनमध्ये उघड्यावर टाकणे किंवा घरासमोर रस्त्यालगत फेकून दिल्या जात असल्याचे चित्र होते. मुख्य बाजारपेठेतही हीच स्थिती होती. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात घाणीचे ढीग साचल्याची परिस्थिती होती. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी प्रत्येक घरातून, बाजारपेठेतून कचरा जमा करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ८० आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ४५ वाहनांची खरेदी केली. मनपाची आर्थिक स्थिती भक्कम नसल्यामुळे मानधन किंवा कंत्राटी तत्त्वावर वाहन चालकांची नियुक्ती करण्यापेक्षा घंटागाडीवर 'स्वयंसेवकां'ची नियुक्ती करण्याचे धोरण पत्करले. घरातून कचरा जमा करण्याच्या बदल्यात प्रतिमहिना ३० रुपये आणि दुकाने, कमर्शियल कॉम्प्लेक्स, हॉस्पिटल, हॉटेल, महाविद्यालय व बाजारपेठमधून कचरा जमा करण्याच्या बदल्यात प्रतिमहिना २०० रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला....

फोटो - http://v.duta.us/x7wv9AAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/PXcMxQAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬