मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

  |   Akolanews

अकोला: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात मतदान व मतमोजणी होणार आहे. सिलबंद मतदान यंत्रे व संबंधित साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील पाचही मतदान मोजणी केंद्रांवर १०० मिटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बुधवारी आदेश् निर्गमित केले.या सर्व मतमोजणी केंद्रांच्या १०० मिटर परिसरात रविवार दि.२० ते शुक्रवार दि.२५ या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला आहे.

असे आहेत प्रतिबंध

१) मतमोजणीच्या वेळी मतमोजणीच्या केंद्रामध्ये अधिकृत पास असल्याशिवाय कोणालाही प्रवेश मिळणार नाही....

फोटो - http://v.duta.us/V4R9ngAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/rRzkpAAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬