महाराष्ट्रात आजपासून पंतप्रधान मोदींच्या सभांचा धडाका

  |   Maharashtranews

मुंबई : आजपासून राज्यात पुन्हा नरेंद्र मोदींच्या सभांचा धडाका सुरू होत आहे. अकोला, जालना आणि नंतर पनवेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत. यापैकी पहिली सभा अकोल्यातल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ क्रीडा मैदानात सकाळी १० वाजता होत आहे. तर दुसरी सभा जालन्यातल्या परतूरमध्ये दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमाराला होणार आहे. त्यानंतर नवी मुंबईतल्या पनवेलमध्ये संध्याकाळी पाऊणे पाच वाजता ते प्रचारसभा घेणार आहेत.

पनवेल, पेण, ऐरोली, बेलापूर विधानसभआ मतदारसंघांतल्या भाजपा शिवसेना आरपीआय महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी, नरेंद्र मोदी खारघरमध्ये सभा घेणार आहेत. खारघरमधील सेक्टर २९ इथल्या सेंट्रल पार्क जवळच्या भव्य मैदानावर ही प्रचारसभा होईल.

यानंतर १७ ऑक्टोबरला नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. परळीमध्ये पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी मोदी सभा घेतील. यानंतर ते साताऱ्याला रवाना होतील. साताऱ्यातून विधानसभेसाठी शिवेंद्रराजे भोसले तर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे भोसले निवडणुकीच्या रिंगणात आहेत....

फोटो - http://v.duta.us/syD3egAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/SPD4jAAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬