युतीनंतर ही उस्मानाबादमध्ये भाजप-शिवसेनेतला संघर्ष शिगेला

  |   Maharashtranews

मुस्तान मिर्झा, झी मीडिया, उस्मानाबाद : निवडणुकीच्या वादातून शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर बुधवारी चाकूनं हल्ला करण्यात आला. विशेष म्हणजे हा हल्लेखोर भाजपचा कार्यकर्ता आहे. सत्ताधारी भाजप-शिवसेनेतला संघर्ष किती शिगेला पोहोचलाय, याचं हे धक्कादायक उदाहरण आहे.

उस्मानाबाद कळंबमधील नायगाव पाडोळी गावात बुधवारी धक्कादायक घटना घडली. शिवसेना उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी खासदार ओमराजे निंबाळकर गाडीतून खाली उतरले. त्याचवेळी अजिंक्य टेकाळे नावाच्या तरुणानं त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. ओमराजेंच्या पोटावर, हातावर आणि मनगटावर त्यानं वार केले. या हल्ल्यात निंबाळकर किरकोळ जखमी झाले. हल्ल्यानंतर आरोपी अजिंक्य टेकाळे पसार झाला. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली. खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा त्याच्याविरुद्ध दाखल झाला आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे शिवसेना खासदारावर चाकू हल्ला करणारा भाजपचा कार्यकर्ता असल्याचं उघड झालंय. हल्लेखोर अजिंक्य टेकाळे हा कळंब भाजप आयटीसेलचा तालुका अध्यक्ष आहे. याआधी त्यानं ओमराजेंच्या विरोधात फेसबुकवर पोस्टही टाकल्या होत्या....

फोटो - http://v.duta.us/iVoajgEA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/wIg_4QAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬