राणेंनी टीका करणे टाळले, उद्धव ठाकरे यांची आज कणकवलीत सभा

  |   Maharashtranews

मुंबई : कणकवलीत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप उमेदवार नितेश राणे यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. त्याआधी माजी खासदार नीलेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये यावेळी विलीन करण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीका केली नाही तसेच राणेंनेही टीका करणे टाळले. राणेंची सभा झाल्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सभा आहे.

भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधात शिवसेनेचा उमेदवार असतानाही मुख्यमंत्र्यांनी दिलेला सल्ला पाळत राणे कुटुंबातल्या कोणीही शिवसेनेवर टीका केली नाही. मात्र उद्धव ठाकरे हे कणकवलीतल्या सभेत राणेंवर बरसणार का, याबाबत आज उत्सुकता आहे. राज्यात भाजप शिवसेनेत युती असली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र युती नाही. उद्धव ठाकरेंच्या तळकोकणात दोन सभा आहेत. दुपारी चार वाचता कणकवलीत तर संध्याकाळी सात वाजता सावंतवाडीमध्ये सभा होणार आहे.

फोटो - http://v.duta.us/qTPf5wAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/JkUG1wAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬