शॅक्स वितरण ड्रॉ प्रक्रिया स्थगित

  |   Goanews

पणजी : प्रतिनिधी

समुद्र किनार्‍यावरील शॅक्सच्या वितरणासाठी 17 ऑक्टोबर रोजी होणारी लॉटरी ड्रॉची प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवली जाईल, असे आश्वासन राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात मंगळवारी (दि.15) दिले. सरकारच्या किनारी शॅक्स धोरणाला बेरोजगार युवकांनी दिलेल्या आव्हान याचिकेवरील सुनावणीवेळी सरकारने हे आश्वासन दिले. पुढील सुनावणी 18 ऑक्टोबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

त्यामुळे पर्यटन हंगाम सुरू झाला असला तरी गोव्याच्या किनार्‍यांवर शॅक्स कधी उभारले जातील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारच्या किनारी शॅक्स धोरण 2019-22 मध्ये 50 टक्के शॅक्स हे 10 वर्षे किंवा त्यापेक्षा जादा अनुभव असलेल्यांना, 40 टक्के शॅक्स हे 5 ते 9 वर्षांचा अनुभव असलेल्या व 10 टक्के शॅक्स हे पाच वर्षांपेक्षा कमी अनुभव असलेल्यांना वितरीत केले जातील, असे निकष ठेवण्यात आले आहेत. या आरक्षणामुळे या व्यवसायात येण्यास इच्छुक असलेल्यांवर अन्याय होईल, अशी बाजू मांडत काही बेरोजगार युवकांनी शॅक्स धोरणाला आव्हान दिले आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Goa/Shakes-halts-the-distribution-draw-process-in-goa/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Goa/Shakes-halts-the-distribution-draw-process-in-goa/

📲 Get goanews on Whatsapp 💬