सातार्‍यात चोरट्यांचा धुडगूस

  |   Sataranews

सातारा : प्रतिनिधी

सातारा शहरातील उपनगरामधील संभाजीनगर व देगाव येथे अज्ञात चोरट्यांनी धुडगूस घालत दोन ठिकाणी घरफोड्या केल्या. चोरट्यांनी घरातून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अजित मारुती जाधव (वय 33, रा. शिवनगर कॉलनी, संभाजीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. 11 ते दि. 13 रोजी या कालावधीत त्यांच्या घरी चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडी व कोयंडा तोडून घरातील लोखंडी कपाटातून सोने, चांदीचे दागिने, मूर्ती, रोख रक्?कम असा एकूण 1 लाख 28 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. सचिन भिकू साबळे (वय 38, मूळ रा.आरफळ सध्या रा.पंताचा गोट) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. 12 रोजी ते दि. 13 रोजी या कालावधीमध्ये चोरी झाली आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/thunderbolt-of-thieves-in-Satara/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Satara/thunderbolt-of-thieves-in-Satara/

📲 Get Satara News on Whatsapp 💬