'हिंमत होती तर पृथ्वीराज चव्हाणांनी माझ्याविरोधात लढायचं होतं'

  |   Sataranews

सातारा : पुढारी ऑनलाईन

राज्यातील विधानसभा निवडणूक आणि सातारा लोकसभा पोटनिवडणूक प्रचाराचा धुरळा उडत असतानाच माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. 'हिंमत होती तर पृथ्वीराज चव्हाणांनी माझ्याविरोधात लढायचं होतं, मी काय दबाव टाकला होता', असा सवाल उदयनराजेंनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड शहरासाठी काहीच केलेले नाही. त्यांना स्वतःचे मत सोडले तर घरच्यांची देखील मते मिळणार नाहीत, असा दावाही उदयनराजेंनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत उदयनराजे हे दोन लाखांच्या मतांनी पराभूत होतील, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली होती. त्यावर उदयनराजेंनी चव्हाण यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. मी विजयी होणारच, जनता माझ्या पाठीशी आहे, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/maharashtra-vidhansabha-election2019-ex-mp-udayanraje-bhosale-criticized-on-prithviraj-chavan/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Satara/maharashtra-vidhansabha-election2019-ex-mp-udayanraje-bhosale-criticized-on-prithviraj-chavan/

📲 Get Satara News on Whatsapp 💬