हर्षवर्धन जाधवांची उद्धव ठाकरेंवर टीका करताना घसरली जीभ

  |   Maharashtranews

औरंगाबाद : माजी मनसे आणि शिवसेनेचे आमदार आणि आता शिवस्वराज्य बहुजन पक्षातून कन्नडच्या मैदानात उतरलेल्या हर्षवर्धन जाधवांची उद्धव ठाकरेंवर टीका करताना जीभ घसरली. जर शिवसेनेला मुस्लिमांचं वावडे आहे तर मग सत्तारांना शिवसेनेत कसे घेतले, असा सवाल करताना त्यांनी उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह विधान केले. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हर्षवर्धन जाधव यांची शिवसेनेवर टीका करताना जीभ घसरली. एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी अश्लील भाषेत टीका केली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोजकेच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक बघायला मिळत आहे.

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी विधानसभेच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेही भाजपकडे असणारा सिल्लोड विधानसभा मतदारसंघ स्वतःकडे घेत सत्तारांना उमेदवारी दिली. सत्तार यांच्या उमेदवारीवरून हर्षवर्धन जाधव यांनी टीका केली आहे.

फोटो - http://v.duta.us/uW1gtgAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/uodWSAAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬