[ahmednagar] - जिल्ह्यात 'मंत्री मतदान' प्रचारात

  |   Ahmednagarnews

'शेवटची निवडणूक'चर्चेत; काहींवर विशेष जबाबदारी

म. टा. प्रतिनिधी, नगर

'तुम्ही भावी आमदाराला नाही तर भावी मंत्र्याला मतदान करणार आहात'....अशा शब्दातील 'मंत्री मतदान' आवाहन सध्या जिल्ह्यातील सहा मतदारसंघात जोरात सुरू आहे. नुकतीच दोन दिवसांपूर्वी आणखी एका मतदारसंघाची यात भर पडली आहे. तर दुसरीकडे 'यंदाची शेवटची निवडणूक' असे भावनिक आवाहनही काही मतदारसंघांतून सुरू आहे. दरम्यान, काही संभाव्य मंत्र्यांवर विशेष कामगिरीची जबाबदारी दिल्याने त्यावर त्यांचे मंत्रिपद ठरणार असल्याचेही सांगितले जाते.

मागील पाच वर्षांच्या युती सरकारच्या काळात तब्बल साडेचार ते पावणे पाच वर्षे केवळ प्रा. राम शिंदे हेच जिल्ह्यातील एकमेव मंत्री होते व याच काळात राधाकृष्ण विखे राज्याचे विरोधी पक्षनेते असल्याने हे दोन नेतेच राज्यभर जिल्ह्याचा डंका वाजवत होते. काही काळानंतर पारनेरचे विजय औटी विधानसभेचे उपाध्यक्ष झाल्याने त्यांचाही जिल्ह्यातील व राज्यातील दरारा वाढला. पण धोरणात्मक निर्णय घेणारे केवळ एकच मंत्रिपद जिल्ह्याला होते. ते आधी राज्यमंत्री होते व नंतर त्यात बढती होऊन ते कॅबिनेटमंत्री झाले, एवढाच एक बदल त्या काळात झाला होता. युती सरकारच्या सत्तेच्या शेवटच्या सहा महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका झाल्या व त्यात पुत्र डॉ. सुजय विखे भाजपचे खासदार झाल्यानंतर राधाकृष्ण विखेंनी काँग्रेसला रामराम ठोकून राज्य सत्तेत गृहनिर्माणमंत्रिपद घेतले व त्यांच्या रूपाने दुसरा मंत्री जिल्ह्याला मिळाला. या पार्श्वभूमीवर सध्या होत असलेल्या निवडणुकीत 'युतीलाच बहुमत मिळणार,' असे दावे करताना 'आम्हीच आता मंत्री होणार,' अशीही पुस्ती त्यामागे जोडली जाऊ लागली आहे व तीच सध्या जोरदार चर्चेत आहे....

फोटो - http://v.duta.us/DfxsmgAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/YCOfvwAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬