[ahmednagar] - दिवाळीच्या सुटीत निवडणुकीमुळे बदल

  |   Ahmednagarnews

म. टा. प्रतिनिधी, नगर

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. याच काळात शिक्षण विभागाने माध्यमिक शाळांना दिवाळी सुट्टी जाहीर केली होती. परंतु, दिवाळीच्या या सुट्टीत अंशतः बदल करावा, अशी मागणी राज्यातील माध्यमिक शिक्षक संघटनांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन शिक्षण संचालकांनी दिवाळी सुट्टीत बदल करण्याचे आदेश नगर माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली.

या आदेशानुसार कार्यवाही करीत माध्यमिक शिक्षण विभागाने २४ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान दिवाळी सुट्टी जाहीर केली आहे. याबाबत शिक्षण विभागाने परिपत्रक काढले आहे. ११ नोव्हेंबरपासून शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. यापूर्वी २१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत शाळांना सुट्टी देण्यात आली होती. परंतु, विधानसभा निवडणुका विचारात घेता या सुट्ट्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी नगर जिल्हा मुख्याध्यापक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती व अन्य शिक्षक संघटनांनी केली होती....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/woyaCQAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬