[ahmednagar] - प्रमुख तीन प्रकल्पांत जूनपासून मोठी आवक

  |   Ahmednagarnews

'भंडारदरा'त २५ तर 'मुळा'त आले ३० टीएमसी पाणी

म. टा. प्रतिनिधी, नगर

जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे व मुळा या तीन प्रकल्पांमध्ये एक जून ते १५ ऑक्टोबर या साडेचार महिन्यांच्या कालावधीमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. या काळात भंडारदरा धरणात जवळपास २५ हजार ८३ दशलक्ष घनफूट व मुळा धरणात ३० हजार ६७१ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. निळवंडे धरणामध्येही या काळात २८ हजार १०८ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झाल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत पाण्याची आवक वाढली आहे. दरम्यान, ही तिन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरल्यांतर धरणामधील 'ओव्हर फ्लो'चे पाणी धरणाचे कालवे व नदीपात्रात सोडण्यात आले.

गेल्या वर्षी जून ते ऑक्टोबर या काळात पडलेल्या अल्प पावसामुळे जिल्ह्याला भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला. यंदा जून महिन्यात तर भंडारदरा धरणाची पाणीपातळी गेल्या ९३ वर्षांत प्रथमच सर्वांत खाली गेली होती. तर, जिल्ह्यातील सर्वांत मोठे असलेल्या मुळा धरणातील पाणीपातळीही जून महिन्यामध्ये पाच हजार दशलक्ष घनफुटांच्या खाली आली होती; मात्र, जिल्ह्यामध्ये जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये मान्सूनचे आगमन झाले व धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाला. या पावसानंतर भंडारदरा, निळवंडे, मुळा या तिन्ही धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू झाली होती. गेल्या साडेचार महिन्यांच्या कालावधीमध्ये या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सातत्याने पाऊस झाल्याने या तिन्ही धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली असून ही धरणे 'ओव्हर फ्लो' झाली....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/uWKqKQAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬