[ahmednagar] - फडणवीस सरकारनं राज्यात गुप्त विहिरी बांधल्यात; धनंजय मुंडेंची तुफान टोलेबाजी

  |   Ahmednagarnews

अहमदनगर: 'राज्यातील शेतकऱ्यांना विहिरी दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगत आहेत. मात्र, त्या विहिरी शेतकऱ्यांना आजपर्यंत मिळालेल्या नाहीत. बहुधा या विहिरी गुप्त असून त्या फक्त भाजपवाल्यांनाच दिसत असाव्यात,' असा सणसणीत टोला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज मुख्यमंत्र्यांना हाणला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत ते बोलत होते. मुंडे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली. 'ईडी'ची भीती दाखवून भाजपवाले शरद पवारांना संपवायला निघाले आहेत. मात्र, आमच्यासारखे लाखो तरुण मावळे राष्ट्रवादीमध्ये आहेत, तोपर्यंत राष्ट्रवादी संपू शकणार नाही. पवार साहेब काय आहेत, हे कळण्यासाठी मोदी आणि शहा यांना दहा जन्म घ्यावे लागतील. पवारांनी महाराष्ट्रात जेवढी विमानतळ उभी केली, तेवढे बस स्टँड देखील गुजरातमध्ये झालेले नाहीत,' अशी तुफान टोलेबाजी मुंडे यांनी केली....

फोटो - http://v.duta.us/rQqd4QAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/hfxqggAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬