[ahmednagar] - मटण न खाल्ल्याने मित्राला ठार मारण्याचा प्रयत्न

  |   Ahmednagarnews

नगरः मित्राला घरी जेवायला बोलवून ताटात वाढलेले मटण न खाल्ल्याच्या रागातून दोघांनी मित्राला मारहाण करून पार्श्वभागात टोकदार वस्तू घुसवून जखमी केले. त्यानंतर अंगावर पेट्रोल ओतून जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नगर तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हे कृत करणाऱ्या लष्करातील जवानासह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. संजय पोपट जाधव (वय ४८ रा. गुंडेगाव) असे जखमीचे जखमी असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. लष्करात जवान असलेल्या बापू एकनाथ हराळ, ज्ञानदेव उत्तम कुसळकर (रा. गुंडेगाव, नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी बुधवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता, त्यांना १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे....

फोटो - http://v.duta.us/svYt6QEA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/gLfQUAAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬