[ahmednagar] - राहुरीतले गुन्हेगार हद्दपार करा

  |   Ahmednagarnews

राहुरीतील प्रचारसभेत शरद पवार यांचे आवाहन

म. टा. वृत्तसेवा, राहुरी

'राज्याची धोरणे ठरविणारा अशी राहुरी तालुक्याची ओळख होती. आता मात्र इथले लोकप्रतिनिधीच गुन्हेगार होत चालले आहेत. त्यामुळे तालुक्याला कलंक लागला आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना धडा शिकवून युवा उमेदवार प्राजक्त तनपुरे यांना विधानसभेत पाठवा,' असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (१५ ऑक्टोबर) शरद पवार यांनी सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके होते. माजी खासदार प्रसाद तनपुरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब थिटे, अरुण कडु, बाजार समितीचे सभापती अरुण तनुपरे, कपिल पवार, सदस्य धनराज गाडे उपस्थित होते. पवार म्हणाले, 'एकेकाळी राज्याचे नेतृत्व कोण करणार हे राहुरीत ठरत होते. दिवंगत यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यासह अनेक दिग्गज राहुरीत बैठका घेऊन धोरणे ठरवित होते. त्यासाठी दिवंगत बाबुराव तनपुरे पुढाकार घेत असत. आज मात्र तालुक्याची ओळख 'गुन्हेगारी' अशी झाली आहे. हे चिंताजनक आहे. युतीच्या पाच वर्षांच्या काळात सर्वच क्षेत्रात अधोगती झाली. अनेक समस्यांनी तरुण, बेरोजगार, शेतकरी, महिला हतबल झाल्या आहेत. एकेकाळचा राहुरी तालुका सधन होता. सध्या इथले लोकप्रतिनिधीच गुन्हेगार होत चालले आहेत. अशा प्रवृत्तींना धडा शिकवा. भाजप सरकारने सत्तेचा गैरवापर केल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अभ्यासू व चारित्र्यवान उमेदवारांची निवड करणे महत्वाचे असल्याने या वेळी तरूण मतदारांनी निवडणूक हातात घेतल्याचे चित्र राज्यात दिसत आहे. राहुरीतही तसेच घडत आहे. मागील वेळी चूक केली होती, ती आता दुरुस्त करण्याची संधी आहे. मागील पाच वर्षांत अभिमान वाटावा असे कोणतेही काम राज्यात झालेले नाही. केवळ आश्वासने देण्यात आली आहेत. ती पूर्ण झाली नाहीत. उद्योगधंदे बंद पडत चालल्याने बेरोजगारांची संख्या वाढली. हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना सत्ताधाऱ्यांना सोयरसुतक राहिलेले नाही. कर्जमाफी मिळाली नसल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत. तालुक्यातील आमदारांनी सत्तेचा वापर कशासाठी केला, याची माहिती घेतली असता त्यांचे काम कुठेत दिसले नाही. त्यांच्या गुन्ह्यांचीच माहिती मिळाली. मात्र, बरे झाले भाजपने पुन्हा त्यांनाच मैदानात उतरविले. आता मतदारांनीच त्यांचा समाचार घेण्याचे ठरविल्याने भाजपच्या उमेदवाराचा पराभव निश्चित आहे....

फोटो - http://v.duta.us/qcwACwAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/TXcgWQAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬