[aurangabad-maharashtra] - 'औरंगाबाद मध्य'मध्ये दारोदार फिरत प्रचार

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात उमेदवारांसह कार्यकर्ते, पदाधिकारी, समर्थकांनी मंगळवारी दारोदार फिरून प्रचार करत मतदारांना आवाहन केले. शिवसेना, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, भाकप आदी पक्षांच्या उमेदवारांनी प्रचार फेरी काढत कॉर्नर सभा घेतल्या.

शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल, एमआयएमचे नासेर सिद्दीकी, वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईगळ, भाकपचे अॅड. अभय टाकसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे कदीर मौलाना यांच्यासह १४ उमेदवार रिंगणात आहेत. भगतसिंगनगर, मयूर पार्क, खडकेश्वर, जयसिंगपुरा, चांदवाडी, ज्युबली पार्क, सम्राट कॉलनी, बेगमपुरा, पहाडसिंगपुरा, एमएसईबी कॉलनी, गुरू गणेशनगर, विद्युत कॉलनी, संभाजी सोसायटी, निपट निरंजन सोसायटी, सुशबू सोसायटी, सुयोगनगर, विद्यापीठ गेट, कबाडीपुरा, पंचकुवाँ, बुढ्ढीलेन, किलेआर्क, स्वामी विवेकानंदनगर, अंगुरीबाग, फकीरवाडी, चुनाभट्टी, गांधीनगर, खोकडपुरा, संस्थान गणपती मंदिर, भाजी मंडई, नारळीबाग आदी परिसर प्रचारफेऱ्यांनी दुमदुमला. कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन पक्षाची भूमिका, उमदेवाराचा परिचय, भविष्यातील योजनांची माहिती दिली. प्रचारफेऱ्यांमध्ये महिला, युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/_KTlnAAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬