[aurangabad-maharashtra] - काँग्रेस-राष्ट्रवादी दहाच्या काट्यावर; दहा-दहाच जागा जिंकणार: मोदी

  |   Aurangabad-Maharashtranews

जालनाः मराठवाड्याच्या नावाने विकासाच्या योजना तयार करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचे नातेवाईक आणि चेलाचपाट्यांची घरे भरली या सगळ्यांना विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण साफ करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. परतुर येथील जाहीर सभेत ते बोलत होते. महाराष्ट्राला मराठवाड्याने तीन मुख्यमंत्री दिल्यानंतरही मराठवाड्यातील परीस्थितीत काहीही बदल झालेला नाही. रस्ते, पाणी, दवाखाने, वीज या सगळ्या पायाभूत सुविधांसाठी येथील लोकांना तडफडत राहावे लागले. मराठवाड्याच्या मुख्यमंत्र्यांचा हा परीसर असताना येथील विकास गेला कुठे? असा प्रश्न मोदी यांनी उपस्थित केला. त्यांच्या तीन मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळासोबत भाजपच्या एकाच मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळाची तुलना करण्याचे आवाहन मोदींनी केले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिल्लीत अनेक वर्षे राज्य केले त्यांची नियत खोटी होती सगळ्या कामात यांची भागीदारी होती यामुळेच मराठवाड्याचे नुकसान झाले. योजना मराठवाड्यासाठी तयार व्हायच्या, नाव मराठवाड्याच्या लोकांचेच घेतले जायचे परंतू विकास मराठवाड्याचा नाही तर याच नेत्यांच्या नातेवाईक, मित्रमंडळी, चेलाचपाट्यांचा झाला अशी २०१४ पूर्वीची स्थिती होती. आपण खरे बोलतो आहोत अशा लोकांना पुन्हा निवडून देणार आहात काय? याचे राजकारण चालू देणार आहात काय? असा प्रश्न मोदींनी उपस्थित केला....

फोटो - http://v.duta.us/rgz6TwAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/qDD30gAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬