[aurangabad-maharashtra] - वंचित-एमआयएमची मतांसाठी व्यूहरचना

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वंचित बहुजन आघाडी आणि मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमिन (एमआयएम) यांची आघाडी तुटली असली तरी, दलित-मुस्लिम मतांसाठी दोन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू आहे. पूर्व मतदारसंघात 'वंबआ'ने 'एमआयएम'चे उमेदवार डॉ. गफ्फार कादरी यांना पाठिंबा दिला आहे मात्र, इतर मतदारसंघात मतांसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लिम मतदारांना धर्मनिरपेक्ष शक्तींसोबत चालण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनानंतर पु्न्हा 'एमआयएम' व 'वंबआ'च्या तुटलेल्या आघाडीची चर्चा सुरू झाली आहे. औरंगाबाद पूर्व मतदारसंघात 'एमआयएम'चे उमेदवार डॉ. गफ्फार कादरी यांना 'वंचित'ने पाठिंबा दिला आहे मात्र, कादरी चांगल्या विचाराचे असल्याने पाठिंबा दिल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. इतर मतदारसंघात मुस्लिम मतदारांनी 'वंचित'ला साथ द्यावी अशी साद आंबेडकर यांनी घातली आहे. मध्य आणि पश्चिम मतदारसंघात दोन्ही पक्षात चुरस आहे. पश्चिम मतदारसंघात 'एमआयएम'चे अरुण बोर्डे यांची मुस्लिम व दलित मतांवर भिस्त आहे. 'वंचित'चे संदीप शिरसाट यांनीही परंपरागत मतदारांवर लक्ष केंद्रीत केले आहे. मध्य मतदारसंघात 'वंचित'चे अमित भुईगळ आणि 'एमआयएम'चे नासेर सिद्दीकी प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत. या उमेदवारांनी विरोधी गटाच्या मतांकडे लक्ष वळवले आहे. खासदार इम्तियाज जलील यांच्याशी संबंध बिघडल्यानंतर आंबेडकर यांनी टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर दलित-मुस्लिम मतांसाठी दोन्ही पक्षात तीव्र संघर्ष होण्याची शक्यता आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/3V6eNwAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬