[aurangabad-maharashtra] - शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकरांवर चाकू हल्ला

  |   Aurangabad-Maharashtranews

उस्मानाबादः उस्मानाबादचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर एका तरुणाने चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. कळंब तालुक्यात पडोळीमधील नायगाव येथे हा हल्ला झाला. या हल्ल्यात ओमराजेंना कुठलीही दुखापत झालेली नाही. ते सुखरुप आहेत. शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी ते गावात रस्त्यावरून चालत होते. त्यावेळी हा प्रकार घडला.

ओमराजे निंबाळकर हे पडोळी नायगाव येथे प्रचार करत होते. यावेळी गर्दीतून आलेल्या एका तरुणाने हात मिळवत त्यांच्या पोटावर दुसऱ्या हाताने चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. पण ओमराजे यांनी दुसरा हात मध्ये घालत हा चाकू हल्ला अडवला. यानंतर हल्ला करणारा तरुण पळून गेला. ओमराजेंच्या घड्याळावर चाकूचा वार बसल्याने त्यांना कुठलीही दुखापत झाली नाही. ते सुखरूप आहेत. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत....

फोटो - http://v.duta.us/ssVlMgAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/MFM77gAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬