[aurangabad-maharashtra] - ४० टक्के मतचिठ्यांचे जिल्ह्यात वाटप

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

येत्या आठवड्याभरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून यासाठी प्रशासनाच्या तयारीने वेग घेतला आहे. सध्या मतदारांना मतचिठ्ठी (पोलिंगचिट) वाटप करण्याचे काम वेगात सुरू आहे. जिल्ह्यात आजपर्यंत जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघामध्ये ४० टक्के मतचिठ्ठ्या वाटप करण्यात आल्याचा अंदाज निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी वर्तविला.

ग्रामीण भागात सरासरी ४०, तर शहरी मतदारसंघातील ३० टक्के मतदारांना पोलचिटचे वाटप झाल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली. ग्रामीण भागात फुलंब्री, सिल्लोड, कन्नड, वैजापूर, गंगापूर, पैठण मतदारसंघ असून शहरी भागात औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मध्य, असे तीन मतदारसंघ आहेत. जिल्ह्यात नऊ मतदारसंघांत २८ लाख ४९ हजार ७५५ मतदार असून या सर्व मतदारांना १९ ऑक्टोबरपर्यंत मतचिठ्या वाटपचे काम संपेल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ईव्हीएम सिलिंगचे काम सुरू आहे. ज्या मतदारसंघातील कर्मचारी प्रशिक्षण संपले आहे, तेथे मतचिठ्ठी वाटपाच्या कामांनी वेग घेतला आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/zOY3DQAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬