[kolhapur] - निवडणुकीत सुशिक्षित बेरोजगारांची चांदी

  |   Kolhapurnews

कोल्हापूर : विधानसभा निवडणूक प्रचाराला जोर आला आहे. उमेदवारांकडून नवनवीन प्रचार तंत्राचा वापर करत मतदाराला आकर्षित केले जात आहे. प्रचारात पक्षाकडून सोशल मीडियाची जाण असलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना प्राधान्य दिले जात असून त्यांना १० ते १५ हजारांपर्यंत मानधन दिले जात आहे. यामुळे सोशल मीडियावर 'अपडेट' असणाऱ्या तरुणाईच्या हाताला काम मिळाले आहे.

गेल्या पाच वर्षांत निवडणूक प्रचार तंत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. मुद्रित माध्यमाबरोबर सोशल मीडियावर उमेदवाराच्या कामाचे सादरीकरण करण्यास प्राधान्य दिले जात आहे. याकामी सोशल मीडियावर कायम अपडेट असणाऱ्या तरुणांचा शोध घेऊन त्यांच्याकडे प्रचाराची जबाबदारी सोपवली जात आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार युवकांना संधी मिळत आहे. या माध्यमातून तरुणांचे प्रश्न समजावून घेऊन त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी नेते प्रयत्न करताना दिसतात. प्रभावी सोशल नेटवर्किंग करून युवा मतदार आपल्या बाजूने राहील, यासाठी सोशल मीडिया समनव्यक २४ तास मेहनत घेत आहेत. चांगले मानधन, आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊन सोशल मीडियात आपण चर्चेत राहू यासाठी उमेदवार अधिक मेहनत घेताना दिसतात....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/_WAdDwAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬