[kolhapur] - प्रचाराची घाई अन् उमेदवारांची दमछाक

  |   Kolhapurnews

कोल्हापूर टाइम्स टीम

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातही राजकीय तर्क-वितर्क, चर्चांना उधाण आले आहे. नेत्यांच्या जाहीर सभा, प्रचार फेऱ्यांनी करवीर विधानसभा मतदारसंघातील बालिंगे, वाकरे, दोनवडे, मौजे खुपीरे आदी गावांतील राजकीय वातावरण ढवळून निघाले. मतदानासाठी अवघा आठवडा हाती उरल्याने कमी वेळात मतदारसंघ पिंजून काढताना उमेदवारांची दमछाक होत असल्याचे चित्र दिसते.

ग्रामीण भागात खेडोपाडी, वाड्या-वस्त्यांवर जाऊन प्रचारासाठी उमेदवारांसह कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे. भाजप-शिवसेना युतीच्या व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांनी कंबर कसली असून करवीर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके आणि काँग्रेसचे पी. एन. पाटील यांच्यात थेट लढत आहे. ग्रामीण भागातील सार्वजनिक सोसायट्यांच्या कट्ट्यांवर, पारावर, मुख्य चौकात राजकीय चर्चांना उत आला आहे. मंगळवारी सकाळी बालिंगे गावातील हायस्कूल चौकातल्या पारावर ज्येष्ठ नागरिकांमध्ये चर्चा रंगली होत्या. 'यंदा वारं कुणाचं', इथपासून 'आता बदल हवाच' अशा उस्फुर्त प्रतिक्रियांनी वातावरणात रंगत आणली. चर्चेत विनोद घडला की हास्याचे फवारे उडत होते....

फोटो - http://v.duta.us/AXdxhQAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/Knw29AAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬