[kolhapur] - मतदार याद्या, प्रचारही ऑनलाइन

  |   Kolhapurnews

कोल्हापूर टाइम्स टीम

झटपट मतदान आणि मतमोजणीसाठी जसा ईव्हीएम मशीनचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे नवमतदारांना नाव नोंदणीसाठी निवडणूक आयोगाने ऑनलाइन नावनोंदणीची सुविधा निर्माण केली आहे. तंत्रज्ञानामुळे झालेला बदल हा प्रचारातही दिसून येऊ लागला आहे. पारंपरिक प्रचाराबरोबर आधुनिक प्रचार यंत्रणांचा उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून घेतला जात आहे. सभा, मेळावे, रॅली, पदयात्रा बरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांशी थेट संपर्क साधला जात आहे. बदललेला प्रचाराचा ट्रेंड सर्वांनाच आकर्षित करत आहे.

निवडणूक कोणतीही असो, प्रचाराचे एक तंत्र ठरले होते. जाहीर सभा, मेळाव्याबरोबर ठिकठिकाणी पक्षाचे झेंडे, बॅनर लावणे आणि घरोघरी पक्षाचा जाहीरनामा पोहोचवणे. पण गेल्या काही निवडणुकीपासून पारंपरिक प्रचाराचा बाज कायम ठेवताना त्याला नवा ट्रेंड दिला जात आहे. विशेषत: मोबाइल क्रांतीनंतर तर हा ट्रेंड सर्व पक्षाच्या उमेदवारांना जवळचा वाटू लागला आहे. व्हॉट्स, ट्विटर, इस्टांग्राम, फेसबुक आणि फोनद्वारे थेट मतदारांपर्यंत संपर्क साधला जात आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/4_vjUAAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬