[kolhapur] - रविकांत तुपकरांची स्वाभिमानीत 'घरवापसी'

  |   Kolhapurnews

कोल्हापूरः माजी खासदार व शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे खंद्दे समर्थक असलेले रविकांत तुपकर यांनी अवघ्या २० दिवसात स्वाभिमानी पक्षात घरवापसी केली आहे. २० दिवसांपूर्वी त्यांनी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी देत राज्यातील मंत्री सदाभाऊ खोत यांच्या 'रयत क्रांती'मध्ये प्रवेश केला होता. परंतु, ते पुन्हा एकदा राजू शेट्टी यांच्या पक्षात आले आहेत. कोल्हापुरात त्यांनी राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यामुळे भाजपचे मित्रपक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर रविकांत तुपकर यांनी राजीनामा दिल्यामुळे राजू शेट्टी यांना मोठा धक्का बसला होता. रविकांत तुपकर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. परंतु एके काळचे सहकारी आणि 'रयत क्रांती संघटने'च्या सदाभाऊ खोत यांच्याशी त्यांनी संधान बांधले होते. मी गेल्या अनेक वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक सक्रीय कार्यकर्ता म्हणून कार्यरत होतो. माझ्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होती. पण आज प्रदेशाध्यक्षपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, तो मंजूर करावा', असे रवीकांत तुपकर यांनी राजीनामा देताना म्हटले होते. बुलडाण्यातील चिखली मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे म्हटले जात होते. परंतु 'कमळ' चिन्हावर निवडणूक लढवण्याची अट त्यांना घालण्यात आली होती....

फोटो - http://v.duta.us/bsSTjgAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/WlwxcgAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬