[mumbai] - उन्हाच्या चटक्यांनी मुंबईकर हैराण

  |   Mumbainews

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईमध्ये मंगळवारी कमाल तापमानाच्या पाऱ्याने ३६ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला. सांताक्रूझ येथे ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर कुलाबा येथे ३६.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. मंगळवारच्या तापमानामुळे मुंबईकर हैराण झाले होते. दुपारी फिरताना उन्हाचे चटके बसले.

सांताक्रूझ येथे कमाल तापमानाचा पारा सरासरीहून ३.२ अंश जास्त होता तर कुलाबा येथे हे तापमान सरासरीपेक्षा ३.६ अंशांनी जास्त होते. मुंबईचे मंगळवारचे तापमान ऑक्टोबरमधील यंदाचे सर्वाधिक तापमान आहे. पुढील किमान दोन दिवस तापमानाचा पारा ३५ ते ३६ अंशांदरम्यान असण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर शुक्रवारी तापमान थोडे कमी होण्याची शक्यता आहे. सध्या पूर्वेकडून वारे वाहत आहेत....

फोटो - http://v.duta.us/B3508AAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/MUMsfQAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬