[mumbai] - डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा विचार करणाऱ्यालाच मत

  |   Mumbainews

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे. तयार करण्यात येणारे कायदेही डॉक्टरांना सुरक्षा देणारे नाहीत; त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात प्राधान्याने विचार करणाऱ्या उमेदवारालाच मत दिले जाईल, असा निर्धार 'इंडियन मेडिकल असोसिएशन' (आयएमए) या डॉक्टरांच्या संघटनेने व्यक्त केला आहे.

निवडणुकांच्या आधी आरोग्याच्या प्रश्नांवर काम करण्याची आश्वासने प्रत्येक राजकीय पक्षांकडून दिली जातात. प्रत्यक्षात मात्र त्यांची पूर्तता होत नाही. त्यामुळे वैद्यकीय सोयीसुविधांचा विषय हा राजकीय व सामाजिकदृष्ट्या प्राधान्याने विचारात घेतला जात नाही. आरोग्याच्या प्रश्नांवर जी आश्वासने देण्यात येतील, त्यांची पूर्तता करणाऱ्या उमेदवारालाच मत देण्याचे आवाहन असोसिएशनने केले आहे. प्रत्येक क्षेत्रामधून विविध प्रकारच्या मागण्यांचा जाहीरनामा तयार करण्यात येतो. आरोग्याच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून डॉक्टरांनी त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/y3OuQgAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬